कारच्या धडकेत पादचारी वृद्धा गंभीर जखमी

अज्ञात चालकावर गुन्हा दाखल
मुंबई- गोवा महामार्गावर हूंबरठ एसपी बोअरवेल ऑफिस समोर गोवा -मुंबई लेनने चालत जात असलेल्या मनोरमा दिगंबर पाटील (75) यांना अज्ञात पांढऱ्या रंगाच्या ओमनी कारने धडक देऊन कारचालक पसार झाला. या अपघातात मनोरमा दिगम्बर पाटील(रा.हुबरठ) या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना स्थानिकांनी उपचारासाठी प्रथम कणकवली उपजिल्हारुग्णालयात आणि तेथून अधिक उपचारासाठी गोवा- बांबुळी येथे दाखल केले. त्यांच्यावर सध्या तेथे उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी 6.45 वा. च्या सुमारास घडला .या अपघाताची खबर यश रामचंद्र मेस्त्री (रा.वरवडे )यांनी कणकवली पोलिसात दिली.अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. दरम्यान आज सकाळी या बाबतची तक्रार देण्यासाठी मनोरमा यांचे महिला नातेवाईक कणकवली पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. मात्र त्यांची दुपारी दोन वाजे पर्यंत तक्रार घेतली नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. दुपारनंतर अखेर ही तक्रार दाखल करून घेण्यात आली.
कणकवली प्रतिनिधी





