निसर्ग भ्रमंतीतून जनजागृती वनविभागाचा अनोखा उपक्रम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा ,सहायक वनसंरक्षक सावंतवाडी (खा.कु.तो.) डॉ.सुनील लाड व वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनपरी क्षेत्र कुडाळ अंतर्गत वनपरिमंडळ मालवण येथील धामापूर मधील धामापुर वनक्षेत्रात शिवाजी विद्यामंदिर काळसे प्रशालेच्या विद्यार्थी व पर्यावरण प्रेमी ग्रामस्थ यांची निसर्ग भ्रमंती आयोजित करण्यात आली होती. उपस्थित विद्यार्थी, ग्रामस्थ यांना वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ . चेतन पाटील, व सम्यंतक संस्थेचे सदस्य महंमद , वयम् नर्सरी चे मालक प्रथमेश काळसेकर यांनी धामापूर वनक्षेत्रातील विविध वनस्पती, पक्षी, मुंग्या, कीटक यांची ओळख , त्यांचे पर्यावरणीय महत्त्व तसेच धामापूर तलावाचे महत्त्व व त्याचा इतिहास याबाबत सविस्तर माहिती दिली. जल, जंगल, जमीन यांचे संरक्षण व पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर वनक्षेत्रातील जैवविविधतेचेच्या नोंदी घेऊन Public Biodiversity register तयार करण्यात येणार असून त्यामुळे पर्यावरण प्रेमींना धामापूर वनक्षेत्रातील जैवविविधतेबाबत खूप चांगल्या प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे असे श्री चेतन पाटील , वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी सांगितले आहे. शालेय विद्यार्थ्यांना या निसर्ग भ्रमंती मधून खूप काही शिकावयास मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदर निसर्ग भ्रमंती वेळी वनक्षेत्रपाल कुडाळ श्री. चेतन पाटील, ग्रामपंचायत धामापूर सरपंच श्रीम.परब ,उपसरपंच श्री.निवतकर,सम्यंतक संस्थेचे सभासद, प्रशालेच्या शिक्षिका श्रीम. आजगावकर मॅडम व सहशिक्षक, श्री . सदानंद परब, वनपाल मालवण, श्री अतुल खोत, वनरक्षक धामापूर, RRT पथक कुडाळ व मालवण चे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!