एकता पॅनेलला कुडाळ एमआयडिसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा पाठींबा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची निवडणूक
अध्यक्ष मोहन होडवडेकर यांनी केले स्पष्ट
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चर या उद्योग क्षेञातील शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या चेंबरची द्विवार्षिक निवडणूक येत्या ११ जून रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ एमआयडिसी. इंडस्ट्रीज असोसिएशनने एकता पॅनेलला आपला पाठिंबा दिला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडवडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, यापूर्वीच चेंबरचे अध्यक्ष म्हणून तरूण व अभ्यासू असे अध्यक्ष म्हणून शरविंद्र माणगावे यांची बिनविरोध निवडणूक झालेली असून कोकणात काही कारणामुळे बिनविरोधवर सहमती न झाल्याने ही निवडणूक होत आहे. विद्यमान अध्यक्ष रविंद्र माणगावे, माजी अध्यक्ष खुशालभाई पोंदार, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल लोढा तसेच माजी कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब यांच्या मार्गदर्शनाखाली एकता पॅनेलचे अनुभवी उमेदवार सामोरे जात आहेत.
एकता पॅनेलमधून कोकण विभागातून उपाध्यक्ष पदासाठी युनियन बँकेतून वरिष्ठ प्रबंधक म्हणून निवृत्ती घेऊन बांबूला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले संतोष राणे हे उमेदवार असून चेंबरच्या गव्हर्निंग कौन्सिलसाठी सामाजिक कार्यकर्ते अँड नकुल पार्सॅकर तसेच राजन नाईक, मनोज वालावलकर, मिलिंद प्रभू, विजय केनवडेकर, पुंडलिक तथा विशाल परब, कुणाल वरसकर उमेदवार आहेत. हे सर्व एकता पॅनेलचे कार्यक्षम व विविध क्षेत्रात सकारात्मक विचार घेऊन जिल्ह्यात गेली अनेक वर्ष काम करणारे उमेदवार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी,जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे कोकणातील योग्य प्रतिनिधित्व करण्यासाठी एकता पॅनेलच्या सर्व उमेदवारांना सभासदांनी भरघोस मतानी निवडणून द्यावे असे आवाहन कुडाळ एम. आय डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष व उद्योजक मोहन होडावडेकर यानी केले आहे. कुडाळ एम. आय डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनच्या आयोजित केलेल्या बैठकीत त्यानी एकता पॅनलला असोसिएशनचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे.





