मुंबईत पदपथावर बेघर व वंचिततेचे जीवन जगणाऱ्या बांधवांची कोंकण गोव्यात जीवन सहल

मुंबईतील बेघर बांधवांचे संविता आश्रमात उत्स्फूर्त स्वागत.
दारिद्रयाच्या कारणाने मुंबईतील पदपथावर हजारो देश बांधव त्यांच्या कुटुंबासह वर्षानुवर्षे बेघर आणि वंचिततेचे जीवन जगत आहेत. या बांधवांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी संदिप परब यांच्या जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते आश्रम, शेल्टर होम आणि डे केअर सेंटर द्वारे कार्यरत आहेत.
संदिप परब यांच्या पुढाकारातून कार्व्हर डे सेंटर अंतर्गत मुंबईतील खाररोड येथे पदपथावर वंचिततेचे जीवन जगणाऱ्या बांधवांची नुकतीच कुडाळ, गोवा येथे कोंकण जीवन सहल आयोजित करण्यात आली. या सहलीतील सहभागीनचे संविता आश्रमातील युवा कार्यकर्त्यांनी आरती ओवाळून उत्स्फूर्त आली प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले.
सहलीतील सहभागी बालके आणि त्यांच्या माता मु. केसरी ता. सावंतवाडी येथील मत्स्यालयातिल रंगबिरंगी मासे आणि पक्षी पाहून हरखून गेले. गोव्यातील बागा बीचवर समुद्रात मनसोक्त डुंबण्याचा सर्वांनी आनंद घेतला. चोडणा येथे वाहणे आणि माणसांना पैल तीरावर नेणाऱ्या गोवा सरकारच्या फेरी बोट मध्ये बसण्याचा आनंद घेतला.
ओल्ड गोवा चर्च मधील संत फ्रान्सिस यांच्या संवर्धित पवित्र पार्थिवाचे दर्शन घेतले.
मुंबईच्या पदपथांवर संघर्षाचे दिवस जगणाऱ्या वंचित कुटुंबातील बालकांनी आज कोकण आणि गोव्याच्या कुशीत नवे स्वप्न अनुभवले.
बेघर आणि वंचित बांधवांना सन्मानाने जगण्याची वाट दाखवणाऱ्या या सहलीत माणुसकीचे सुंदर दर्शन घडले. आपुलकीच्या या प्रकाशात आशेची नवी पहाट उगवली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, सन्मान व आत्मविश्वासाची नवी फुले उमलली.
संस्थेच्या संविता आश्रम, समक्ष आश्रम, SVRC, संवेदना आश्रम, मा Aasroghar आश्रम मधील incharge व कार्यकर्त्यांनी सहलीच्या संयोजनासाठी महत्वाची भूमिका निभावली.





