झाराप येथे १४ ला सुतार ज्ञातीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ, सिंधुदुर्गच्या वतीने रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने सुतार ज्ञातीतील बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने अध्यक्ष शरद मेस्त्री यांनी केले आहे.
झाराप येथील श्री देवी भवाई मंदिर नजीकच्या श्री विश्वकर्मा भवन येथे हा गुणगौरव सोहळा होणार आहे. सन २०२५-२६ मध्ये शिष्यवृत्ती परिक्षा, तसेच इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर परिक्षेमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या सुतार ज्ञाती बांधवांच्या मुलाचा यावेळी गुणगौरव केला जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुतार ज्ञातीतील मुलानी आपल्या तालुक्यातील जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचेशी संपर्क साधावा. तसेच दि. १२ जून २०२६ पर्यंत विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रके मंडळाचे कार्यकारिणी सदस्य अनंत मेस्त्री, माणगाव (मो. क्रमांक 9403365076) या संपर्क यांच्याकडे पाठवावीत. दि. १२ जून २०२६ पर्यंत आलेल्या गुणपत्रकाच्या आधारे प्रथम तीन क्रमांक निवडून त्यांना बक्षीस दिले जाणार आहेत.
तसेच विद्यार्थी व पालक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहाणे आवश्यक आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुतार समाज ज्ञातीतील २०२५-२६ या वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने अध्यक्ष शरद मेस्त्री यांनी केले आहे.

error: Content is protected !!