कणकवली मुख्याधिकाऱ्यांकडून अतिक्रमण हटावकरिता पथक नियुक्त

नगररचनाकार अक्षता रोळे यांची पथकाचे पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती

कणकवली नगरपंचायत च्या आज होणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहीमेकडे सर्वांचेच लक्ष

कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी अतिक्रमण हटाव पथक गठीत केले असून नगर रचनाकार अक्षता रोळे यांची या पथकाच्या पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्यासोबत त्यांना सहाय्यक म्हणून एकूण 18 जणांची नियुक्ती करण्याबाबतचे आदेश मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिले आहेत. कणकवली शहरातील रस्त्यावर तसेच दुतर्फा व फुटपाथ वरील अतिक्रमण, अनधिकृत स्टॉल अनधिकृत बांधकाम काढणे बाबतची कारवाई या पथकाकडून करण्यात येणार आहे. मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमणाबाबत कारवाईची भूमिका ही गांभीर्याने घेतली असल्याने आज होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!