कणकवली शहरातील पोलिसांच्या “त्या” कारवाईची दबक्या आवाजात चर्चा

सुरुवातीला धाड मारली, त्यानंतर मात्र प्रकरण मिटवा मिटवीसाठी राजकीय नेत्यांना संपर्क

“त्या”च्या भूमिकेची कणकवलीत चर्चा

कणकवली शहरातील एका नव्याने अस्तित्वात आलेल्या रस्त्या लगत असलेल्या एका कॉम्प्लेक्स मधील एका कॅफे मध्ये काल दुपारी 4 वाजताच्या सुमारास एकाने मारलेली धाड व त्यानंतरची पोलिसांची इंट्री शहरात चर्चेचा विषय बनली आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये तळमजल्यात असलेल्या एका कॅफेत काही आक्षेपार्ह प्रकार सुरू असल्याचा दावा करत एका उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भातील यापूर्वी कारनामे चर्चेत असलेल्याने धाड मारली. चौथ्या स्तंभाच्या नावाखाली त्याचे पोलीस व उपजिल्हा रुग्णालयातील fz पासून अनेक कारनामे चर्चेत असून, त्याच्याशी संबंधित एक जण त्या कॅफेमध्ये गेली म्हणून ही धाड मारल्याचा त्याचा दावा होता. त्यानंतर नेहमीप्रमाणे पोलिसांना या ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याची खबर “त्याने” दिली. पोलिसांनी या ठिकाणी तपासणी केली. तपासणी दरम्यान या ठिकाणी सुरुवातीला धाड मारणारा चौथ्या स्तंभातील देखील एक जण थेट सहभागी होता अशी चर्चा आहे. त्यानंतर त्याच्याकडून काही राजकीय नेत्यांना देखील रेटकार्ड वाढवण्यासाठी फोन केले गेले. त्या कॅफेमध्ये आल्यानंतर पोलिसांनी तेथे सापडलेल्या काहींना पोलीस स्टेशनला नेत कानउघडनी केली. पोलिसांच्या धाडीदरम्यान त्या कॅफेमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू देखील सापडल्याचे समजते. या घटनेनंतर कणकवलीतील एका पक्षाचे पदाधिकारी देखील पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. त्यांनी देखील या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका घेतली. परंतु ज्याने सुरुवातीला धाड मारली त्यानेच या प्रकरणात मिटवा मिटवीसाठी प्रयत्न केले. व याकरिता काही राजकीय नेत्यांना फोन देखील केले. त्यामुळे या साऱ्या प्रकाराची संशयाची सुई त्याच्या सहित पोलिसांवर येत असून, अशा प्रकारे कारवाई करता गेलेल्या पोलिसांनी या प्रकरणी सुमोटो पद्धतीने गैरकृत्याबद्दल कारवाई का केली नाही? असा देखील सवाल कणकवली शहरवासीयांमधून उपस्थित केला जात आहे. त्यातच या कारवाई मागे अन्य काही बाबी चर्चिल्या जात असून, या साऱ्या प्रकरणाचा उलगडा होणार का? की अशाच प्रकारे कारवाईच्या नावाखाली अन्य काही प्रकार कणकवलीत सुरू होणार? याची चर्चा आता जनतेतून उपस्थित केली जाऊ लागली आहे.

error: Content is protected !!