सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते एस. एस.मुंबरकर यांचे निधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते सखाराम शिवराम तथा एस. एस. मुंबरकर यांचे दिनांक 28 एप्रिल, 2026 रोजी ठाणे येथील जुपिटर रुग्णालयात उपचार घेत असताना वयाच्या 80 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
एस. एस. मुंबरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध चळवळीत खूप मोलाची भूमिका बजावली आहे.
मुंबई महानगरपालिकेत वयाच्या चौदाव्या वर्षी बॉय म्हणून नोकरी स्वीकारून अहोरात्र मेहनत घेऊन वर्ग- एकच्या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांनी पुणे विद्यापीठाची समाजशास्त्र या विषयात एम.ए. ही पदवी संपादन केली होती. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ,मुंबई चे ते काही काळ अध्यक्क्ष म्हणून जबाबदारी संभाळली होती.
एस.एस. मुंबरकर यांनी शिक्षण क्षेत्रातही आपल्या समाजकार्याचा ठसा उमटवला होता. बौद्ध समाजातील गरीब गरजू मुलांना उच्च शिक्षणासाठी त्यांनी सातत्याने आर्थिक मदत आणि मार्गदर्शनाचा हात पुढे केला होता. गेली दोन वर्षे ते आजारीच होते.
एस.एस.मुंबरकर यांच्या जाण्याने बौद्ध समाजाच्या एका सच्चा कार्यकर्त्याला मुकलो आहोत अशी प्रतिक्रिया देत जिल्ह्यातील जेष्ठ बौद्ध कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, भाऊ नातवंडे असा मोठा परिवार आहे.





