श्री.अनिकेत तटकरे यांचा रत्नागिरी–रायगड–सिंधुदुर्ग मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज दाखल.

राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा.
कणकवली/प्रतिनिधी
रत्नागिरी–रायगड–सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.सुनील तटकरे यांचे सुपुत्र श्री.अनिकेत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला.अर्ज दाखल करण्याच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक हे देखील असंख्य कार्यकर्त्यासह रत्नागिरी येथे उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
श्री.अबिद नाईक यांनी यावेळी विश्वास व्यक्त करत सांगितले की, “ही निवडणूक निश्चितच सकारात्मक निकाल देणारी ठरेल आणि श्री.अनिकेत तटकरे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.”
या कार्यक्रमाला महायुतीचे सर्व राजकीय नेते तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला होता आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक ताकद स्पष्टपणे दिसून आली.





