सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानप्रकरणी एकाची जामिनावर मुक्तता

कुडाळ येथील आंबेडकरनगर ते कुडाळ रेल्वे स्थानक रस्त्याचे काम सुरू असताना सार्वजनिक मालमत्तेला आग लावून नुकसान केल्याचा आरोप असलेल्या समीर नाना कुडाळकर याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी ऍड. राजीव बिले यांच्यासह ॲड. दत्ताराम बिले, ॲड. हेमांगी वराडकर आणि ॲड. तेजस सावंत यांनी काम पाहिले.
आंबेडकर नगर ते कुडाळ रेल्वे स्थानक रस्त्याचे काम सुरू असताना समीर नाना कुडाळकर याने सार्वजनिक मालमत्तेस आग लावून नुकसान केले प्रकरणी कुडाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून आरोपीस कलम ३, ४ सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम,१९८४ अन्वये अटक करण्यात आली होती. या जामीन अर्जकामी ॲड. राजीव बिले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी आरोपीस १५ हजार रुपयांच्या जामिनावर सशर्थ जामीन मंजूर केला. या प्रकरणी आरोपीच्या वतीने ॲड. दत्ताराम बिले, ॲड. हेमांगी वराडकर आणि ॲड. तेजस सावंत यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!