चिपी–नवी मुंबई विमानसेवा सुरू होताच दीपक कपूर यांची मंत्री नितेश राणे यांना सदिच्छा भेट

विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल व्यक्त केले आभार


सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज मंत्रालयात पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा एकदा नवी मुंबईशी हवाई मार्गाने जोडणारी विमानसेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेत झालेल्या सहकार्याबद्दल यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाल्याने सिंधुदुर्गच्या हवाई वाहतुकीला पुन्हा चालना मिळाली आहे. या सेवेमुळे जिल्ह्यातील नागरिक, पर्यटक आणि व्यावसायिकांना मुंबई महानगर प्रदेशाशी हवाई संपर्काची सुविधा उपलब्ध झाली आहे.

error: Content is protected !!