अल निनो बाबत त्रिंबक ग्रामपंचायत येथे जागृती

त्रिंबक ग्रामपंचायत तर्फे आयोजित विशेष ग्रामसभेत अल निनोबाबत जनजागृती करण्यात आली.त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षा सांबारी ,उपसरपंच सुचिता घाडीगावकर सहाय्यक कृषी अधिकारी कुरकुटे , सहाय्यक कृषी अधिकारी हंसराज देवकत यांसह इतर ग्रामपंचायत सदस्य शेतकरी बंधू , ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी हंसराज देवकत यांनी वातावरणातील बदल आणि त्या नुसार शेती मध्ये घ्यावयाची काळजी या बद्दल माहिती दिली.तसेच अलनिनोच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा योग्यप्रकारे वापर,भातपीकांच्या कमी दिवसांत होणा-या जातींचा वापर , सेंद्रीय खतांचा वापर वनराई बंधारे याबाबत जनजागृती करत मार्गदर्शन करण्यात आले.

error: Content is protected !!