शोभा बागवे यांची कणकवली महिला उपतालुकाप्रमुख पदी निवड

महिला जिल्हाध्यक्ष नीलम सावंत पालव यांनी केली निवड जाहीर

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शोभा बागवे यांचा सत्कार

कणकवली महिला उपतालुकाप्रमुख पदी बोर्डवे गावच्या शोभा बागवे यांची निवड जाहीर करण्यात आली. महिला जिल्हाप्रमुख सौ नीलम पालव यांनी ही निवड जाहीर केली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, तालुकाप्रमुख राजू राठोड, प्रथमेश सावंत, कळसुली विभाग प्रमुख चंद्रहास उर्फ बबली राणे व विभागातील तालुक्यातील बहुसंख्य कट्टर शिवसैनिक उपस्थित होते. शिंदे गटाला धक्का देत पंचायत समिती सदस्य यांना धक्का देत स्थानिक कार्यकर्त्यांना कंटाळून शोभा बागवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन तालुक्याच्या महत्त्वाच्या महिला उपतालुकाप्रमुख पदी निवड करून त्यांचा व कळसुली विभागाचा सन्मान केला.

error: Content is protected !!