मंत्री नितेश राणे यांचे कौतुक करावे तेवढे थोडे

भाऊ असल्याचा सार्थ अभिमान

आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऐतिहासिक दिवस : आमदार निलेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळाची उभारणी करून येथून प्रमुख शहरांशी सिंधुदुर्गला हवाई सेवेने जोडण्याचे स्वप्न राणे साहेबांनी पाहिले. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. ते स्वप्न त्यांचे सुपुत्र तथा पालकमंत्री नितेश राणे पुढे घेऊन जात पूर्णत्वास नेत आहेत, याचा विशेष अभिमान आहे. राणे साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे, तर पालकमंत्री नितेश राणे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने पुढाकार घेत नवीमुंबई-चिपी विमानसेवा सुरु सुरु करण्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले. केंद्र व राज्य शासनाच्या भक्कम पाठबळातून अखेर चिपी–नवी मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. ही विमानसेवा यापुढेही विनाखंडित सुरू राहणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. नितेश राणे हे आपले भाऊ असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. चिपी–नवी मुंबई विमानसेवेच्या शुभारंभामुळे आजचा दिवस समस्त सिंधुदुर्गवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!