कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळ, शिवडाव यांच्या वतीने कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्रद्धांजली कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवडाव (राऊतखोलवाडी) येथील श्री. बाळा भिसे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘रक्तदान जीवनदान’ हा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी अगत्याने उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळ व श्री. बाळा भिसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!