महाराष्ट्रातील 130 विद्यार्थ्यांची इस्त्रोला भेट

डायमंड टॅलेंट सर्च एक्सामचा उपक्रम
डायमंड टॅलेंट सर्च एक्साम घेण्यात आलेल्या इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी इस्त्रोला भेट दिली. 130 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
11 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून निवड झालेले 130 विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी संस्थांचे 15 शिक्षक प्रतिनिधी सहभागी झाले होते. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी अहमदाबाद (गुजरात) येथील वैज्ञानिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट दिली: विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी भारताच्या अंतराळ मोहिमा, उपग्रह आणि रॉकेट तंत्रज्ञानाची माहिती घेतली. गुजरात सायन्स सिटीमध्ये विज्ञानातील नवनवीन शोध आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला. साबरमती आश्रमामध्ये महात्मा गांधींच्या जीवनकार्याची आणि स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची ओळख करून घेतली. साबरमती रिव्हरफ्रंट, अटल ब्रिज आणि कांकरिया तलाव या स्थळांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी निसर्ग आणि मनोरंजनाचा आनंद लुटला. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन अंतराळ संशोधन, विज्ञान, इतिहास आणि मनोरंजन या सर्वांचा एकत्रित विद्यार्थ्यांना अनुभव घेता आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी हा दौरा यशस्वी ठरल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.





