खोपोलीतील बस अपघातात भिरवंडे येथील तरूणी ठार

ढोल पथकातील अन्य सहकाऱ्यांसोबत गेली होती पुणे येथे

पुणे ते मुंबई जाणाऱ्या खोपोली (जि. रायगड) येथे खासगी प्रवाशी बसला आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघात भिरवंडे (ता. कणकवली ) गावातील खलांतर वाडी येथील मुळ रहिवाशी जुई दिपक सावंत (वय १८ सध्या. रा. गोरेगाव, मुंबई) ही जागीच ठार झाली आहे. पुणे येथे एका कार्यक्रमात ढोलपथकातील सहकारी म्हणून ती पुणे येथे गेली होती. खाजगी बस मध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव(मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते. या पथकातील अनेक कलाकार मुली आणि मुलगे १४ ते २० वयोगटातील अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. जूई हीच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!