ब्लू स्टार, चेंदवण यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा

शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन

कुडाळ ; ब्लू स्टार, चेंदवण यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आज दि. १५, १६ आणि १७ एप्रिल २०२३ रोजी मर्यादित षटकांची ‘एक गाव एक संघ’ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा (मर्यादित एससी प्रवर्गासाठी) आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मैदान (तलावानजीक ) या ठिकाणी पार पडला. यावेळी रुपेश पावसकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच उत्तरा धुरी, शाखाप्रमुख किरण कोचरेकर, ग्रामपंचायत सदस्य पूर्वा भरडकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा धुरी, साणेकर, स्वप्नील चेंदवणकर, गौतम चेंदवनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी, कुडाळ

error: Content is protected !!