यशराज प्रेरणा ग्रुपचा अनोखा उपक्रम.

शाळेत जाण्यास दांडी मारणाऱ्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी केले समुपदेशन

आचरा– अर्जुन बापर्डेकर

.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर समाज सुधारकाच्या जयंतीच्याऔचित्यावर
या महात्म्यांचे आचरण डोळ्यासमोर आणून शिक्षणासाठी टंगळमंगळ करणारया मुलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रेरित करण्याचे काम आचरा येथील यशराज प्रेरणागृपच्या सदस्यांनी करत एक वेगळाच संदेश दिला आहे.तसेच या संघटनेने निराधार चिंदरकर कुटुंबीयांची भेट देऊन त्यांना मानसिक आधार दिला.
शासन मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र काही मुले शाळेत जाण्यास कंटाळा करत पालकांसमोर टेन्शन निर्माण करत असतात. अशाच मुलांना आणि त्यांच्या पालकांना मुलांना शाळेत जाण्याच्या दृष्टीने प्रेरीत करण्याचे काम यशराज प्रेरणा गृप कडून करण्यात आले. याअगोदरही विविध समाजोपयोगी उपक्रमांमधून यशराज प्रेरणा गृप ने आपली ओळख निर्माण केली आहे.
आचरा येथील कष्टकरी कुटूंबातील मुले मुळातच खूप हुशार असूनही शाळेत जाण्यास टंगळमंगळ करायची.मुलांना समजावून शाळेत पाठविणे म्हणजे पालकांसाठी मोठे जिकिरीचे बनले होते.हे जेव्हा यशराज प्रेरणा ग्रुपला कळले तेव्हा त्यांनी थेट त्या कुटुंबीयांना भेट घेत मुलांसहित पालकांनाही शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.मुलांना शाळेत जाण्यासाठी काय अडचणी आहेत त्या समजावून सांगत
त्यांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहीत केले. तसेच
नवीन शैक्षणिक वर्षात मुले दररोज नक्कीच शाळेत जातील असे आश्वासन त्यांच्या पालकांकडून घेतले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष .मंदार सरजोशी, जितेंद्र राऊळ,चैतन्य ठाकूर,संगीता राणे चिंबे ,भावना मुणगेकर ,धनश्री आचरेकर ,प्रियांका हिंदळेकर ,पूजा आचरेकर ,कैलास गुरव आदी सहभागी झाले होते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो–
यशराज प्रेरणा आचरा संघटनेने निराधार चिंदरकर कुटुंबीय यांना भेट देऊन त्यांना मानसिक आधार दिला..

error: Content is protected !!