बालोद्यान लोकार्पण सोहळ्यात बच्चे कंपनीसाठी फनी गेम्सची धूम !

मोर नृत्य, कोंबडा नृत्य, चिंपाजी, हापूस आंबा, गरुड नृत्य, सुरवंट, तात्या विंचू शो
कुडाळ : कुडाळ तहसीलदार कार्यालयानजिक नगरपंचायतीमार्फत नव्याने साकारण्यात आलेल्या बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा सोमवार, १७ एप्रिल २०२३ रोजी सायं ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे केली जात आहेत. शहरातील लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ७५ लाख रूपये निधीतून तहसीलदार कार्यालयानजिक सुसज्ज बालोद्यान प्रकल्प साकारण्यात आला आहे. याठिकाणी विविध खेळणी बसविण्यात आली असून या बालोद्यानाचे काम पूर्ण झाले आहे.
सोमवार, १७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता उद्घाटन सोहळा, सायं. ५.४५ वा. गणेश पूजन, सायं. ६ वाजता लहान मुलांचे फनी गेम्स, सायं. ७ वाजता लहान मुलांचे लकी ड्रॉ होईल. मुख्य म्हणजे संध्याकाळी ५ वाजता खास आकर्षणांमध्ये मोर नृत्य, कोंबडा नृत्य, चिंपाजी, हापूस आंबा, गरुड नृत्य, सुरवंट, तात्या विंचू शो आणि ढोलपथक असेल. लकी ड्रॉ कुपन बालोद्यान येथे सायंकाळी ५.३० पासून मोफत उपलब्ध असतील. तसेच लकी ड्रॉ विजेत्यास सायकल बक्षीस देण्यात येईल. या लोकार्पण सोहळ्यास कुडाळवासीयांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले आहे.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ