संत राऊळ महाराज महाविद्यालयात सायन्स लॅब समर स्कूल संपन्न

कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने महाविद्यालयामध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 23 एप्रिल ते 28 एप्रिल 2026 या कालावधीत ‘सायन्स लॅब समर स्कूल 2026’ या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात सुमारे 85 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक व स्वागत रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक तसेच उपक्रमाचे समन्वयक डॉ. सुहास पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ स्मिता सुरवसे यांनी उपस्थित सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
या शिबिरामध्ये गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र या विभागांतर्फे विविध प्रात्यक्षिके, सादरीकरणे व व्याख्याने आयोजित करण्यात आली. दररोज तीन तास चालणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करत विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. या शिबिरात कुडाळ हायस्कूल, कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम तसेच बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळ येथील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. रवींद्र ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले
समारोप सोहळा 28 एप्रिल 2026 रोजी पार पडला. या वेळी मंडळाचे सहकार्यवाह महेंद्र गवस यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी समन्वयक डॉ. सुहास पाटील यांनी पाच दिवसांच्या उपक्रमाचा आढावा सादर केला, तर काही विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. ज्यामध्ये शमिका आरावंदेकर, अश्वमी देसाई, आणि आयुष्य नातू यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास गणित विभाग प्रमुख डॉ. एस. के. पवार, प्रमुख अतिथी महेंद्र गवस तसेच अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आर. वाय. ठाकूर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ स्मिता सुरवसे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. .

error: Content is protected !!