कनेडी प्रशालेचा अभिनव उपक्रम माझ्या परसबागेतील भाजी माझ्या शाळेतील पोषण आहारासाठी

कणकवली/मयूर ठाकूर

कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री मोहनराव मुरारीराव सावंत जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स श्री तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी व बाल मंदिर कनेडी इंग्रजी माध्यम
या प्रशालेचे वतीने आज 1 मे महाराष्ट्र दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून माझ्या परसबागेतील भाजी माझ्या शाळेतील पोषण आहारासाठी
यांना नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रशालेतील 50 विद्यार्थ्यांना विनामूल्य भेंडी, गवार, दोडकी,भोपळा, कारले, मुळा, लाल माठ अशा सात भाज्यांची प्रत्येकी 150/- रुपये किमतीची बियाणे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सतीश सावंत यांनी दिले.
या 50 विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परसबागेमध्ये आपल्या पालकांच्या मदतीने याची लागवड व जोपासना करावयाची आहे. पावसाळी हंगामामध्ये याचे पीक आल्यानंतर ही भाजी त्या विद्यार्थ्यांकडून शाळेच्या पोषण आहारासाठी विकत घेतली जाईल. त्याचा योग्य तो मोबदला विद्यार्थ्यांना दिला जाईल. कमवा आणि शिका हा या उपक्रमाचा एक दुसरा उद्देश आहे. या उपक्रमा अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट परसबाग असेल अशा प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे2100/-रुपये
1500/-रुपये
व 1100/- रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. पावसाळी हंगामापूर्वी हे बियाणे विद्यार्थ्यांना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी मध्ये परसबागेची योग्य ती मशागत करता येणार आहे तसेच पावसाळा हंगामापूर्वी विद्यार्थ्यांना हे बियाणे दिल्यामुळे पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
या अभिनव उपक्रमाचे पालक वर्गातून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

error: Content is protected !!