27 एप्रिल पासुन राज्यातीलकृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बेमुदत बंद!!

27 एप्रिल 2026 पासून महाराष्ट्रातील कृषी निविष्ठा विक्रेते त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद ठेवणार आहेत.
सिंधुदुर्ग रत्नागिरीसह कोकणातील सुद्धा सर्व कृषी निविष्ठा विक्रेते यात सहभागी होणार आहेत.
भारतातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी महाराष्ट्रातील या बंदला एक दिवस बंद ठेवून पाठिंबा दिला आहे.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी निविष्ठाधारकांनी माननीय जिल्हाधिकारी महोदया, तसेच माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन बंद बाबत कल्पना दिलेली आहे.
सर्व शेतकरी बंधूंना कृषी निविष्ठा संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की याची बेमुदत बंद ची नोंद घेऊन शेतकरी बंधूंनी आपल्या निविष्ठा 27 पूर्वी खरेदी कराव्यात..
कृषी निविष्ठा संघटनेच्या मागण्यांमध्ये मुख्यता खते, बियाणे बाबत नवीन असलेले कायदे व त्यातील जाचक अटी व नियम याचे विरोधात हा बे मुदत बंद पुकारण्यात आलेला आहे. तसेच इतर अडचणी शासनासमोर मांडल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बाहेरील राज्यातून अनधिकृत पणे येऊन खते, कीटकनाशके व बी बियाण्याची विक्री केली जाते त्यावर निर्बंध घालणे मी प्रमुख मागणी आहे. विनापरवाना अप्रमाणित निविष्ठा विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर कडक कारवाई करणे विषयी संघटनेने मागणी केलेली आहे





