इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

कणकवली : मयूर ठाकूर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता चौथी मधून 12 विद्यार्थी पात्र ठरले असून इयत्ता सातवी मधून 10 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
त्याच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विध्याधर तायशेटे सर,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम सल्लागार डी.पी. तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!