स्टेट लेवल इंग्लिश ग्रामर एक्झाम मध्ये आयडियलच्या गंधार पाटकर चे नेत्र दीपक यश.

कणकवली:मयूर ठाकूर
महाराष्ट्र मुंबई परीक्षा मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्टेट लेवल इंग्लिश ग्रामर परीक्षेत यावर्षी आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे चा विद्यार्थी गंधार हेमंत पाटकर( इयत्ता दुसरी) याने ग्रुप ए मध्ये शंभरापैकी 92 गुण मिळवत एक्सलन्स अवॉर्ड प्राप्त केला आहे
याबद्दल त्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला. ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम आयडियल इंग्लिश स्कूलचे कॉर्डिनेटर निलेश घेवारी सर यांच्या उपस्थितीत नुकताच गंधारचा सन्मान करण्यात आला
त्याच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विध्याधर तायशेटे उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम सल्लागार डी. पी तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.






