कणकवली नगरपंचायत च्या गार्बेज डेपोला भीषण आग

नगरपंचायतीच्या बंबाद्वारे आग आटोक्यात
आज रात्रभर बंब राहणार गार्बेज डेपो जवळच
कणकवली नगरपंचायत च्या गार्बेज डेपोला आज भीषण आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक असल्यामुळे आगीने अचानक भडका घेतल्याने ही आग भीषण स्वरूपात पसरली. मात्र याबाबत माहिती मिळतात कणकवली नगरपंचायत चा नवीन आणलेला बंब दाटीवाटीच्या रस्त्यातूनच दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गार्बेज डेपोपर्यंत पोहोचला. व त्यानंतर आग आटोक्यात आणली. मात्र ही आग धुमसत असल्याने रात्रीपर्यंत हा बंब व कर्मचारी याच ठिकाणी ठेवले जाणार असल्याची माहिती नगरपंचायत कडून देण्यात आली. कणकवली नगरपंचायत या गार्बेज डेपो मधील कचऱ्याला यापूर्वी देखील काही वेळा आग लागली होती. मात्र अशा भीषण स्वरूपात बहुदा गेल्या काही वर्षात लागलेली ही पहिली आग असल्याची समजते. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही आग लागली की लावली गेली? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





