राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटी याला कांस्यपदक

जिल्ह्यातून आर्या याच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आयोजित सीनियर मेन्स अँड वूमन राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन चा बॉक्सर आर्य आवटी याने मेन्स सुपर हेवी वेट या वजनी गटात कांस्यपदक मिळविले. सांगली ,एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल येथे ही स्पर्धा झाली. आर्या आवटी याला पद्माकर फड व अभिनव भार्गव तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ.राजाराम दळवी यांनी मार्गदर्शन केले. कांस्यपदक मिळवल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!