पत्रकार विजय गांवकर यांना मातृशोक

सुनिता साबाजी गांवकर, ८६ , नाडकर्णी नगर, कलमठ, कणकवली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले
श्रीम. सुनिता यांनी आपल्या राहत्या घरीच रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. सुनिता यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातल्या (पाकिस्तान मधल्या) कराची येथे झाला होता. फाळणीच्या झळा त्यांनी बालवयातच सोसल्या होत्या. भारत पाकिस्तान फाळणी नंतर भारतात आल्यावर सुरुवातीला कांही काळ बोरिवलीच्या जंगल सदृश्य भागात वास्तव्य केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना उल्हासनगर येथील बॅराक मध्ये हलविण्यात आले होते, आणि त्यानंतर त्यांचं बालपण आणि तरुण पण या ठिकाणीच व्यतीत झाले होते.
लग्नानंतर त्या मुंबई शहरात वास्तव्यास आल्या परंतु त्यांना त्यांच्या मूळ गाव दिगवळेची ओढ जास्त असल्यामुळे त्या पतीबरोबर वरचेवर दिगवळे येथे येत. अखेर त्यांनी नाडकर्णी नगर कलमठ येथे स्वतःचे घर बांधण्याचा आग्रह धरून या ठिकाणी घर बांधले आणि या ठिकाणी राहिल्या.
विविध खाद्यपदार्थ तयार करणे, नवनवीन खाद्यपदार्थ शोधणे आणि ते इतरांना खाऊ घालणे हे त्यांना जास्त पसंत होते.
कणखर व्यक्तिमत्व म्हणून त्या कुटुंबात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे , नातसूना, पतवंडे आहेत. वरिष्ठ पत्रकार विजय गांवकर यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पार्थिवावर कणकवली येथील स्मशानभूमीत सोमवारी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.






