जनतेच्या प्रश्नावर युवासेने मार्फत आंदोलन छेडण्याचा निर्णय!

युवा सेनेच्या कणकवली तालुका कार्यकारणीच्या बैठकीमध्ये निर्णय

तरुणांच्या प्रश्नासाठी युवा सैनिकांनी आक्रमक राहण्याची गरज

आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवासेनेच्या कणकवली तालुका कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आज कणकवली मध्ये विजय भवन या ठिकाणी घेण्यात आली. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका, जनतेच्या प्रश्नावर आंदोलने सामाजिक उपक्रम यांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक शाखा आणि वॉर्ड स्तरावर युवासेनेची कार्यकारिणी अधिक सक्षम करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. तसेच, नवमतदार नोंदणी मोहीम तीव्र करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले की, “तरुणांच्या रोजगाराचे आणि शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी युवासेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी काळात प्रत्येक सामान्य तरुणापर्यंत पोहोचून संघटना अधिक बळकट करायची आहे. या प्रसंगी युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके उपशहर प्रमुख प्रतीक रासम , विभाग प्रमुख किरण वर्दम, नंदकिशोर परब, निकेतन भिसे, विजय गावकर उमेश गावडे, निलेश रावराणे, वैभव मुरकर, गुरुनाथ पेंडणेकर, सतीश परब, सतीश मर्गज, संदीप गावकर, इमाम बटावले, रमेश राणे, श्रीराम गुरव सिद्धेश गावकर, रोशन गुरव सत्यवान गावकर , प्रवीण गुरव, प्रवीण गावकर, सतीश परब, संदीप गावकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!