आचरा ग्रामपंचायत तर्फे नवनिर्वाचित मालवण सभापती उपसभापती सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आचरा ग्रामपंचायत कार्यालय श्री देव रामेश्र्वर सभागृहात नवनिर्वाचित मालवण पंचायत समिती सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण व उपसभापती घनश्याम झाड यांचा सत्कार कार्यक्रम सरपंच जेरोन फर्नांडिस उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी कासले,तसेच जयप्रकाश परुळेकर, अनिल करंजे ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर,पंकज आचरेकर,
ग्रामपंचायत सदस्या किशोरी आचरेकर, अनुष्का गावकर, पुर्वा तारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सी.आर.पी., प्रभाग अध्यक्ष व सचिव, ग्रामसंघ अध्यक्ष व सचिव आदी उपस्थित होते.यावेळी सर्व महिला ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सी.आर.पी., प्रभाग अध्यक्ष व सचिव, ग्रामसंघ अध्यक्ष व सचिवसभापती व उपसभापती यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाब झाड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उमेद चे प्रभाग समन्वयक श्री. मांजरेकर यांनी मार्गदर्शन केले व आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि. प. शाळा गाऊडवाडी चे शिक्षक राजेश भिरवंडेकर सर यांनी पहिली. तसेच यावेळी बहुसंख्येने उपस्थित महिलांना गुलाब झाड वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!