‘कै. दादा चव्हाण आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार’ निवृत्त पोलीस अधिकारी बबन सावंत यांना प्रदान

‘कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार’
शिवजयंती उत्सव मंडळ हळवल यांच्या वतीने आयोजन
शिवजयंती उत्सव मंडळ, हळवल यांच्या वतीने दिला जाणारा ‘कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार’ यावर्षी गुन्हे अन्वेषण विभागाचे (क्राईम ब्रँच) निवृत्त पोलीस अधिकारी मा. सीताराम उर्फ बबन सावंत यांना देऊन गौरविण्यात आले. डॉ. दिलीप घाडी यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा नुकताच पार पडला.
या सोहळ्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना मा. सीताराम उर्फ बबन सावंत भावूक झाले होते. ते म्हणाले की, “पोलीस दलात, विशेषतः क्राईम ब्रँचमध्ये काम करताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, मात्र आपल्या जन्मभूमीने आणि शिवजयंती उत्सव मंडळाने दिलेला हा ‘आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार’ माझ्यासाठी सर्व पदकांपेक्षा मोठा आहे. हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माझ्या कुटुंबाचा आणि हळवल ग्रामस्थांचा आहे. निवृत्तीनंतरही समाजासाठी आणि गावाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन.”
हळवल येथे शिवजयंती उत्सव मोठया दिमाखात साजरा करण्यात आला यानिमित्ताने सत्यनारायणाची महापूजा, भजने, हरिपाठ, दशावतारी नाटक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास कणकवली चे नगराध्यक्ष मा. संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे यांनी भेट दिली
या कार्यक्रमाला उपतालुकाप्रमुख तथा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजू राणे, अध्यक्ष श्री. रोहित राणे, माजी सभापती मधुकर सावंत, माजी पोलीस पाटील प्रकाश गुरव, उपसरपंच प्रभाकर राणे, सौ. राखी राणे, ॲड. शंकर राणे, झी २४ तासचे पत्रकार उमेश परब यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ग्रामपंचायत सदस्य अनंत राणे, अनिल राणे, सुभाष परब, विजय परब, माजी सरपंच सौ. स्मिता परब, रवी परब, सुभाष राणे, अक्षय सावंत, विकास गुरव, सुधाकर राणे, आप्पा ठाकूर, प्रशांत परब, प्रभाकर चव्हाण, गणेश राणे, मनोहर राऊळ यांसह मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मंडळाच्या वतीने करण्यात आले.





