जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये स्वच्छता मोहीम

कणकवली रोटरी क्लब व नगरपंचायत चे आयोजन
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कणकवली शहरामध्ये कणकवली रोटरी क्लब व कणकवली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन प्रभाग क्रमांक 7 मध्ये करण्यात आले. या प्रभागाच्या नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या संकल्पनेतून महिला दिनानिमित्त या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये कणकवली प्रभाग क्रमांक 7 मधील स्वच्छता करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, वर्षा बांदेकर, निधी निखार्गे, शिल्पा सामंत, मिता कवडे, नीलिमा वालावलकर, राज नलावडे, निनाद ढवळे, आकाश सामंत, भावेश निगरे, व नगरपंचायत कर्मचारी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.





