श्री बाळ गोपाळ मंडळाच्या अध्यक्ष पदी मंदार आचरेकर बिनविरोध

आचरा वरचीवाडी येथील सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमी अग्रेसर असणा-या श्री बाळ गोपाळ मंडळाच्या अध्यक्षपदी भजनीबुवा आणि मंडाळचे हरहुन्नरी कार्यकर्ते मंदार आचरेकर यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदी महेंद्र आचरेकर,यांची निवड झाली.सचिव पदी विलास आचरेकर उर्वरित मंडळ ,सहसचिव गोविंद शेट्ये,खजिनदार पंकज आचरेकर सदस्य पदी किशोर आचरेकर, संदीप चव्हाण, अक्षय लाड, सौ मनाली आचरेकर यांची बिनविरोध निवड पार पाडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांनी काम पाहिले. यावेळी मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णू लाड, बबन शेट्ये, वामन आचरेकर, आनंद आचरेकर, रामदास आचरेकर यांसह बहुसंख्येने महिला वर्ग आदी सदस्य उपस्थित होते.





