बालगोपाळ मंडळाचा 75वा वर्धापन दिन उत्साहात

आचरा वरचीवाडी येथील बालगोपाळ मंडळाचा वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी संतसेन महाराज, विठ्ठल गजरात आचरा तिठा ते बाजारपेठ दरम्याने संत दर्शन चित्ररथासह दिंडी फेरी काढण्यात आली. यावेळी बालगोपाळ मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी महाप्रसादानंतर रात्रौ भजन, मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले.





