ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांची सायंकाळी पत्रकार परिषद

ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांची सायंकाळी पत्रकार परिषद

उद्या मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत यांची पत्रकार परिषद महत्त्वपूर्ण

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद बोलविली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तसेच कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्वाची मानली जात आहे. त्यातच उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंधुदुर्ग दौरा असताना या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला घेतल्या जाणाऱ्या या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पत्रकार परिषदेत सतीश सावंत काय बोलणार त्याकडे सारे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!