मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचा भाजपा प्रवेश?

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय घडामोडीना वेग
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राजकीय संकेत
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत असतानाच उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवली जाहीर सभा होत आहे. या जाहीर सभेदरम्यान काही ठाकरे सेनेचे मोठे नेते व एकेकाळी नारायण राणेंचे निकटवर्तीय ओळख असलेल्या एका बड्या नेत्याचा भाजपा प्रवेश होण्याची शक्यता आहे. या भाजपा प्रवेशाच्या शक्यतेमुळे राजकारणात मोठ्या घडामोडी व उलथापालथी होणार असून आज या नेत्याच्या निकटवर्तीयांन माघार घेतल्याने ही चर्चा अजून जोर धरत आहे.





