गणेशप्रसाद गवस यांची कोलझर पंचायत समिती सदस्यपदी बिनविरोध निवड

जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीच्या राजकीय इतिहासातील पहिलीच घटना
सर्वांनीच घेतले उमेदवारी अर्ज मागे
कोलझर पंचायत समिती मतदारसंघातील ३ अपक्षांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे ( शिंदे गट) उमेदवार गणेशप्रसाद गवस बिनविरोध निवडून आले. दोडामार्ग तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकीय इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. वंचित बहुजन आघाडीचे सखाराम कदम, अपक्ष यशवंत गवस, दौलतराव देसाई ,शिरीषकुमार नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रवीण परब यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतले.





