भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा ११ जानेवारी रोजी

कणकवली कॉलेज व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी या दोन केंद्रांवर होणार परीक्षा

पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) व पूर्व माध्यमिक (८ वी) च्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले विद्यार्थी या सराव परीक्षेस बसू शकतील

प. पू. भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश अर्जासोबत प्रवेश शुल्क रूपये १०० भरून पावती घ्यावी. प्रवेश अर्ज भालचंद्र महाराज संस्थान कणकवली व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी.. कुलकर्णी सर , श्री. रावजी परब सर. सावंतवाडी येथे उपलब्ध आहेत.
प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २५ डिसेंबर आहे. आयत्यावेळी प्रवेश दिला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी श्री. गजानन उपरकर (९५६१३४७५२५) , विजय केळुसकर.. व्यवस्थापक, सिद्धेश कुलकर्णी.. कळसुलकर हायस्कूल व रावजी परब. सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!