जगनाडे महाराज जयंती खारेपाटण येथे उत्साहात संपन्न

तेली समाज खारेपाटण व संताजी सेवा मंडळ खारेपाटण यांच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती आज सोमवार खारेपाटण येथील श्री हनुमान मंदिर येथे उत्साहात झाली.
श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून खारेपाटण तेली समाज बांधव मंडळाचे अध्यक्ष रमेश जामसंडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला तेली समाज बांधव कणकवली तालुका उपाध्यक्ष – महेश कोळसुलकर, तेली समाजाच्या महिला कार्यकर्त्या व भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटणच्या संचालिका मनस्वी कोळसुलकर तसेच श्री संताजी सेवा मंडळ खारेपाटण या मंडळाचे उपाध्यक्ष मनोहर तेली, सचिव गणेश तेली, खजिनदार नारायण कोळसुलकर, श्री. गणेश जामसंडेकर, प्रकाश नानिवडेकर, शाम कोळसुलकर, नाना झगडे, राजन कोळसुलकर, बबन तेली, सुरेश कोळसुलकर, सुनील तळगावकर आदी उपस्थित होते.
तेली समाजाच्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित गुणवंत महिला व पुरुष यांचा संताजी सेवा मंडळ खारेपाटणच्या वतीने सत्कार करण्यात आला.





