शक्तिप्रदर्शन करत शहर विकास आघाडी मार्फत नगराध्यक्ष पदाकरता संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

कणकवली शहर विकास आघाडीचे “हे” आहे उमेदवार

कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे सादर केले. त्यावेळी त्यांच्यासोबत कणकवली शहर विकास आघाडीतील अन्य उमेदवार व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. गेले काही दिवस संदेश पारकर रिंगणात उतरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच संदेश पारकर यांनी मी ही निवडणूक लढवणार असून कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाकरीता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. व त्यानंतर कणकवली शहरातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला. दरम्यान संदेश पारकर यांच्यासोबत अन्य शहर विकास आघाडीच्या कणकवली शहर विकास आघाडी चे प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस राणे, प्रभाग क्रमांक 2 मधून साक्षी आमडोसकर, प्रभाग क्रमांक 3 मधून सुमित राणे, प्रभाग क्रमांक 4 मधून जाई मुरकर प्रभाग क्रमांक 5 मधून नेहा वाळके प्रभाग क्रमांक 6 मधून सुमेधा अंधारी, प्रभाग क्रमांक 7 मधून सावी अंधारी प्रभाग क्रमांक 8 मधून लुकेश कांबळे प्रभाग क्रमांक 9 मधून रीना जोगळे, प्रभाग क्रमांक 10 मधून शीतल मांजरेकर, प्रभाग क्रमांक 11 मधून दीपिका जाधव प्रभाग क्रमांक12 मधून प्रांजली आरोलकर प्रभाग क्रमांक 13 मधून जयेश धुमाळे, प्रभाग क्रमांक14 मधून रुपेश नार्वेकर प्रभाग क्रमांक 15 मधून संकेत नाईक, प्रभाग क्रमांक16 मधून उमेश वाळके, प्रभाग क्रमांक 17 मधून सुशांत नाईक यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आज दुपारी 3 वाजेपर्यंत चा वेळ असल्याने आजच्या दिवसभरात कणकवली तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

error: Content is protected !!