राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी प्रभाग क्रमांक 17 मधून भरला उमेदवारी अर्ज

तहसीलदार कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

कणकवली नगरपंचायत निवडणुकी करता राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी आज सोमवारी प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रसंगी जिल्हाभरातून राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष युतीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी अबिद नाईक यांनी जाहीर केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री देव महापुरुषाला नतमस्तक होत विजयासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, संजीवनी पवार, विठ्ठल देसाई यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!