तहसीलदारांच्या कक्षात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि संदेश पारकर एकत्र

नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेच्या निमित्ताने आले समोरासमोर

उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

कणकवली तहसीलदार कार्यालय मध्ये आज नगरपंचायत निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र दाखल करायचा अंतिम दिवस असताना आजच्या अखेरच्या दिवशी कणकवली शहर विकास आघाडी यांच्या सर्वच उमेदवारांनी एकाच वेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली. दरम्यान शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासहित त्यांच्या पॅनलचे प्रमुख उमेदवार तहसीलदार यांच्या कक्षात असताना भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांनी पक्षाचे एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. यावेळी नलावडे व पारकर तहसीलदारांच्या कक्षामध्ये एकत्र आले होते. तसेच त्यांचे उमेदवार देखील तहसीलदार यांच्या कक्षात एकत्र होते. त्यामुळे यादरम्यान सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

error: Content is protected !!