भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्याकडून घरोघरी प्रचार सुरू

कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
प्रचार फेरीला उस्फूर्त प्रतिसाद
कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आज घरोघरी प्रचार सुरू केला. कणकवली शहराच्या विकासासाठी सजग राहून भाजपाला मतदान करा. पालकमंत्री नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून विविध सुविधा व विकासासाठी आतापर्यंत आलेला निधी व प्रत्यक्षात झालेली कामे यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासात भर पडली असून यापुढे देखील अशाच प्रकारे विकास करण्याची पुन्हा एकदा संधी द्या. भाजपाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. असे आवाहन यावेळी समीर नलावडे यांनी मतदारांना केले. कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला. यावेळी मतदारांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
कणकवली प्रतिनिधी





