महिला दिनाच्या निमित्ताने पाककला स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबिर

लोरे नंबर 1 ग्रामपंचायत चे आयोजन
महिला दिनाच्या निमित्ताने लोरे नं.1 व गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने महिलांची आरोग्य तपासणी व पाककला स्पर्धा या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुकृपा हॉस्पिटल, कणकवली येथील सौ. सुजाता रावराणे, कॅम्पेन कॉ- ऑर्डीनेटर व त्यांचा स्टाफ रूचिता म्हस्के, अंकिता सावंत, प्राजक्ता पांगम उपस्थित राहून महिलांची HPV तपासणी मोफत केली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने HPV चाचणी करणे का आवश्यक आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन सौ. सुजाता रावराणे यांनी उपस्थित महिलांना केले व ही HPV चाचणी बहुसंख्य महिलांनी केली. पाककला स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त रित्या महिलांनी सहभाग घेतला. या उपक्रमांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे निवड करून त्यांना प्रशस्तीपत्र व सर्व सहभागी महिलांना रोख पारितोषिक देण्यात आले. आजचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम लोरे नं.1 ग्रामपंचायतीचे सरपंच श्री अजय रावराणे यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आला. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी श्री.नरेश गुरव, सौ सुप्रिया रावराणे हे ग्रामपंचायत सदस्य, डॉ. शुभांगी एकावडे, श्री.राकेश गोवळकर, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका सर्व, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, श्री.सुनिल रावराणे आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.





