कणकवलीत ठाकरे शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती?

माजी खासदार विनायक राऊत यांच्या सहित माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

काही वेळेचा माजी खासदार विनायक राऊत भूमिका स्पष्ट करणार

कणकवली नगरपंचायत निवडणुकी करिता ठाकरे शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती आज माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासहित प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आल्या. बंद केबिनमध्ये इच्छुकांसोबत प्रमुख नेत्यांनी चर्चा केली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी नाव निश्चित होत आलेले असलेले उमेदवार संदेश पारकर यांच्यासह अनेक उमेदवार देखील यावेळी उपस्थित होते. कणकवली शहरामध्ये महाविकास आघाडी की शहर विकास आघाडी याबाबत अद्याप भूमिका जरी स्पष्ट झालेली नसली तरी महाविकास आघाडी बाबत सकारात्मक भूमिका खासदार विनायक राऊत यांनी घेतल्याचे समजते. दरम्यान या बैठकीनंतर काही वेळात माजी खासदार विनायक राऊत हे अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. कणकवली मध्ये विजय भवन येथे झालेल्या बैठकीवेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष व पक्ष निरीक्षक अनंत पिळणकर, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, राजू राठोड, सुजित जाधव जयेश धुमाळे संकेत नाईक, तेजस राणे साक्षी आमडोस्कर, संजय पारकर, आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!