कुडाळ मध्ये मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

नगरपंचायत प्रशासनामार्फत शहरात मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज भैरववाडी येथून करण्यात आला. प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून, त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहीती प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अॅड.राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रुती वर्दम व चांदणी कांबळी, संस्थेचे व्यवस्थापक प्रविण कदम, न. पं. चे स्वच्छता निरिक्षक पांडुरंग नाटेकर, अरविंद करलकर, रोहीत भोगटे आदींसह नागरिक व न.पं. कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!