शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार – मिलिंद नाईक

कुडाळ पं. स. वर महायुतीचे सभापती – उपसभापती

मिलिंद नाईक सभापती तर सीताराम तारली उपसभापती

रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या बरोबरच शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर आम्ही करू अशी ग्वाही कुडाळ तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती मिलिंद नाईक यांनी दिली. कुडाळ तालुका पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांची निवड आज पंचायत समिती मध्ये झाली. त्यांनतर मिलिंद नाईक हे माध्यमांशी बोलत होते.
कुडाळ पं. स. त महायुतीचे वर्चस्व असून भाजपाचे सात, शिंदे शिवसेनेचे सहा तर ठाकरे शिवसेनेचे पाच असे एकूण अठरा सदस्यांचे संख्याबळ आहे. महायुतीच्या फाॅर्म्युल्यानुसार सभापती पदासाठी शिंदे शिवसेनेचे साळगाव पं. स. सदस्य मिलिंद नाईक तर उपसभापती पदासाठी भाजपाचे झाराप पं. स. सदस्य सिताराम तेली यांची नावे पक्ष श्रेष्ठींकडून निश्चित करण्यात आली. त्यानंतर महायुतीतर्फे नाईक आणि तेली यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. पाच पं. स. सदस्य असलेल्या ठाकरे शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहीली आहे. त्यामुळे महायुतीतर्फे सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक – एकच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं होत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला निवड प्रक्रिया सुरु झाली. नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रकिया झाल्यानांतर निवडणूक निर्णय अधिकारी अमरसिंह जाधव आणि गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी निवडणूक प्रक्रिया राबविली. सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक – एकच अर्ज आल्याने सभापती म्हणून मिलिंद नाईक आणि उपसभापती म्हणून सीताराम तेली यांना निवड पत्र देण्यात आलं.
त्यांनतर मिलिंद नाईक यांच्यावर सभापती दालनात तर सीताराम तेली यांच्यावर उपसभापती दालनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी शुभेच्छांचा वर्षाव केला.
शेतकऱ्यांसाठी विशेषत्वानं काम करणार असल्याचं यावेळी नूतन सभापती मिलिंद नाईक यांनी सांगितलं. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि महायुतीच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे श्री. नाईक यांनी आभार मानले. सभापती पदाची जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने पार पाडू असा विश्वस्त श्री. नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या सोबतच शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्याचा आपले प्राधान्य असेल असे मिलिंद नाईक यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती सीताराम तेली, शिंदे शिवसेनेचे माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते आणि काका कुडाळकर, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, शिवसेना जिल्हा सरचिटणीस तथा जि. प. सदस्य दादा साईल, जि. प. सदस्य नागेश आईर, पं. स. सदस्य मंगेश प्रभू, बाळकृष्ण मडव, निखिल कांदळगावकर आदींसह महायुतीचे सर्व पं. स. सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!