भाजपाकडून समीर नलावडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

भाजपाचे उद्या शक्ती प्रदर्शन
समीर नलावडे विरुद्ध कोण? प्रश्न अद्याप अनुत्तरित
कणकवली नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून उद्या समीर नलावडे हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून समीर नलावडे हे उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाच यावेळी भाजपाच्या अन्य काही उमेदवारांची देखील नामनिर्देशन पत्र दाखल होणार असल्याचे समजते. त्यामुळे एकीकडे भाजपाकडून समीर नलावडे हे नाव स्पष्ट झालेले असताना मात्र महाविकास आघाडी कडून अद्याप उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे समीर नलावडे विरुद्ध संदेश पारकर अशी लढत होणार की या निवडणुकीत काही वेगळीच रंग देणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





