राजकारणा पलीकडे जात काँग्रेस, भाजप, ठाकरे सेना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र

कणकवली 10 नंबर प्रभागातील अनोखे चित्र चर्चेचा विषय

कणकवली शहराचे राजकारण हे नेहमीच राज्याच्या राजकारणापर्यंत चर्चेत असते. परंतु राजकारणाच्या पलीकडे जात देखील कणकवलीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज भाजपाच्या एका माजी पदाधिकाऱ्याचा वाढदिवस ठाकरे सेना काँग्रेस व भाजप च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत साजरा केला. कणकवलीतला 10 नंबर प्रभाग हा कणकवलीच्या निवडणुकीमध्ये नेहमी चर्चेत असतो. या 10 नंबर प्रभागा मधूनच अनेकदा शहरातील राजकीय घडामोडी घेत असतात. यावर्षी नगरपंचायत च्या निवडणुकीत देखील हाच 10 नंबर चा प्रभाग सुरुवातीपासून चर्चेत राहिला. येथील माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा आज वाढदिवस काँग्रेस, ठाकरे सेनेसह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत साजरा केला. बहुदा या प्रभागांमध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची ही वेगळी युती किंवा आघाडी होण्याचे हे संकेत तर नाहीत ना? असा देखील मिश्किल प्रश्न काहींकडून या ठिकाणी विचारला जाऊ लागला. नगरपंचायत च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकारण बाजूला ठेवत हे सर्वजण एकत्र आल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. यावेळी भाजपाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होतेच. पण त्यांच्या सोबतच शिशिर परुळेकर यांच्या मित्र परिवारातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, ठाकरे सेनेचे कार्यकर्ते जय शेट्ये, हे देखील या शुभेच्छांच्या वेळी उपस्थित होते. त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या. एकूणच राजकारणा पलीकडे मित्रत्वाचे संबंध जपणे हे सर्वश्रुत आहेत. पण 10 नंबर प्रभागात आज पाहायला मिळालेले हे चित्र मात्र भविष्यातील कोणत्याही राजकीय गणितांची समीकरणे तर जुळवली जाण्यासाठी कारणीभूत ठरणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

error: Content is protected !!