कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपा कडून प्रचारात आघाडी

ग्रामदेवते सह शहरातील प्रमुख मंदिरात दर्शन घेत केला प्रचाराचा शुभारंभ
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाने प्रचाराचा सर्वप्रथम शुभारंभ करत प्रचारात आघाडी घेतली आहे. कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू, श्री देव रवळनाथ मंदिर त्याच सोबत भालचंद्र महाराज, पटकीदेवी मंदिर, येथे दर्शन घेत सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली. प्रचाराच्या शुभारंभ वेळी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे बंडू हर्णे, राजश्री धुमाळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, अण्णा कोदे, मेघा गांगण सुप्रिया नलावडे, किशोर राणे, गौतम खुडकर, राकेश राणे, संजय कामतेकर विठ्ठल देसाई, भालचंद्र वरवडेकर, संजना सदडेकर, राजू गवाणकर, ॲड. विराज भोसले, किशोर राणे, अभिजीत मुसळे, बाबू गायकवाड, गौतम खुडकर, बंडू गांगण, राजन परब, माधवी मूरकर, मेघा सावंत, अभय राणे, कल्याण पारकर, प्रद्युम मुंज, सुशील दळवी, नवराज झेमने, भरत उबाळे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.





